देश सेवा बजावत असताना विंग कमांडर डी वत्स यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज अंत्य संस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी पाच दिवसाच्या नवजात बाळासोबत हजर झाली. ‘खंबीर राहणं म्हणजे काय असतं’ याचीच प्रचिती डी वत्स यांच्या पत्नीकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला आली. डी वत्स यांची पत्नी मेजर कुमूद डोगरा लष्करी अधिकारी आहेत. पाचच दिवसांपूर्वी त्यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. आसाममध्ये १५ फेब्रुवारीला मजुली आयर्लंडवर भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यात हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट शहीद झाले. यामध्ये डी वत्स हेही होते. दु:खद बाब म्हणजे, डी वत्स आपल्या मुलीचा चेहराही पाहू शकले नाहीत. या वीरपत्नीला देशवासीयांनी अनोख्या पद्धतीने ‘सलाम’ केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर ट्विट आणि पोस्ट शेअर करून डी वत्स यांच्या या चिमुकलीला आशीर्वादही दिले आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews